पुणे । नवऱ्या-बायकोला नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना पुण्यातून समोर आली आहे. कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या पतीने घरगुती वादातून शिवण मशीन कात्रीच्या साह्याने पत्नीच्या गळ्यावर वार करुन खून केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. खून केल्यानंतर त्याने खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. पुण्यात चक्क नवऱ्याने बायकोला कात्रीने गळा चिरुन मृत्यू दिला आहे. त्यानंतर आरोपी नवऱ्याने व्हिडीओ केला आणि तिला संपवण्यामागचं कारण सांगितलं. सेल्फ डिफेन्स आणि मुलाच्या भविष्यासाठी तिला संपवल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये कबूल केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवदास गीते याला पोलिसांनी अटक केली आहे. गिते मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी पहाटे त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर शिवदासने घरातील शिलाई मशीनच्या कात्री ने ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले.या घटनेनंतर पतीनं मुलाला खुर्चीवर बसवून व्हिडीओ केला. त्याने आपण असं केला याचा खुलासा केला आहे.
‘माझ्यासाठी लक्ष्मी होती पण…तिनेच हे करायला भाग पाडलं’
लक्ष्मी होती ती माझ्यासाठी, मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळालं, तिचे लक्षणं बरोबर नव्हती. मी काय करणार मी माणूसच आहे, मला स्वत:चं संरक्षण करण्यासाठी तिचं वाईट करायची वेळ आली. मला माझी इच्छा नव्हती.ही मरावं म्हणून, लक्ष्मी होती. एका पोराला जन्म दिला, आई होण्याचं भाग्य होतं. ही मला मारायचा प्रयत्न करते. एक जिंदाल बाई होती. तिचे भाऊ तो पांडूरंगा आघाव, सानप, माझा मेव्हणा, त्यांनी लय शाळा केलेली आहे. आमच्या गावातलं बी एक खर आहे. त्यांनीही मला मारायचा प्रयत्न केला. तेही यामध्ये सामील असेल.
Discussion about this post