रेल्वेत भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने आज गुरूवारपासून ३२,००० हून अधिक पदांसाठी भरती सुरू केली. अर्ज करू इच्छिणारे उमेदवार आजपासून RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात, असे देखील रेल्वे बोर्डाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
सीईएन क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत आरआरबीने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, भरती मोहिमेत ७ व्या सीपीसी पे मॅट्रिक्सच्या लेव्हल १ मध्ये ३२४३८ विविध पदे भरली जाणार आहेत.
यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२५ आहे. याशिवाय, उमेदवार २३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंतच्या अंतिम तारखेनंतर अर्ज शुल्क भरू शकतील. अर्ज दुरुस्तीसाठी सुधारणा विंडोची तारीख आणि वेळ २५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ आहे, असेही रेल्वे बोर्डाने म्हटले आहे.
अवाश्यक पात्रता :
अर्ज करणाऱ्या उमेदवार दहावी पास असावा. किंवा आयटीआय पास असावा. संभाव्य अर्जदारांची वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते ३६ वर्षांच्या दरम्यान असावी.
‘परीक्षा शुल्क’
रेल्वे भरतीसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या (Open) वर्गातील उमेदवारांना ₹५०० परीक्षा शुल्क भरावे लागेल. CBT मध्ये बसण्यासाठी लागू असलेले बँक शुल्क वजा करून योग्य वेळी ₹४०० परत केले जातील. त्याचप्रमाणे, PwBD/महिला/ट्रान्सजेंडर/माजी सैनिक उमेदवार आणि SC/ST/अल्पसंख्याक समुदाय/आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) च्या उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹२५० आहे, जे बँक शुल्क वजा केल्यानंतर योग्य वेळी परत केले जाईल.
असा करा अर्ज
RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, CEN क्रमांक ०८/२०२४ अंतर्गत RRB भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
लॉग इन करण्यासाठी आणि सबमिट करण्यासाठी तुमचे क्रेडेन्शियल्स एंटर करा.
अर्ज फॉर्म भरा, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
कन्फर्मेशन पेज सबमिट करा आणि डाउनलोड करा.
भविष्यातील संदर्भासाठी कन्फर्मेशन पेजची प्रिंटआउट ठेवा.
Discussion about this post