केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 साठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा सह विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदाच्या परीक्षेसाठी पदांची संख्या एकूण 979 आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही 11 फेब्रुवारी आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती मिळेल. यावेळी UPSC CSE अधिसूचना लवकर प्रसिद्ध करण्यात आली आहे, जेणेकरून उमेदवारांना अधिक वेळ मिळेल आणि त्यांच्या परीक्षेची चांगली तयारी करता येईल.
पदाचे नाव : IAS, IPS, IFS आणि इतर
आवश्यक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
UPSC नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज कसा करायचा?
1. सर्वप्रथम, UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी.
2. मुख्यपृष्ठावरील ‘UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2025 नोंदणी लिंक’ (UPSC Civil Service Preliminary Exam 2025 Registration Link) वर क्लिक करा.
3. एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये उमेदवारांना त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
4. यशस्वी नोंदणीनंतर, उमेदवार अर्ज भरू शकतात.
5. अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
6. अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
Discussion about this post