अखिल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मार्फत भरती निघाली असून यासाठी सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेले उमेदवार 31 जानेवारी 2025 पर्यंत येथे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि उमेदवार AIIMS च्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
या भरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर, हॉस्पिटल अटेंडंट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय.
अर्ज शुल्क
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 3000 रुपये भरावे लागतील. तर SC, ST आणि EWS श्रेणीसाठी 2400 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे फी भरली जाऊ शकते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
एकूण पदांची संख्या
AIIMS ने या भरती प्रक्रियेअंतर्गत ४५५७ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यात नर्सिंग ऑफिसर, पब्लिक हेल्थ नर्स, वरिष्ठ नर्सिंग ऑफिसर, ड्रेसर, हॉस्पिटल अटेंडंट, मल्टी-टास्किंग स्टाफ आणि इतर पदांचा समावेश आहे.
परीक्षेत १०० बहुपर्यायी प्रश्न असतील.
बरोबर उत्तरासाठी ४ गुण मिळतील, तर चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.
परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल.
पात्रता मार्क सामान्य आणि EWS साठी ४०%, OBC साठी ३५% आणि SC-ST साठी ३०% निश्चित करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया
एम्सच्या वेबसाइटला भेट द्या.
तुमची माहिती जसे की नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी भरून नोंदणी करा.
नोंदणीनंतर प्राप्त झालेल्या आयडीसह लॉगिन करा आणि अर्ज भरा.
आवश्यक कागदपत्रे, फोटो, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा अपलोड करा.
फी भरून अर्ज सबमिट करा.
फॉर्मची प्रिंटआउट काढून तु्मच्याकडे ठेवा.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
Discussion about this post