कोलकाता । कोलकाताच्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. आरजी कर मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलमध्ये 31 वर्षीय ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. पीडित डॉक्टर आरजी कर मेडिकल कॉलेज अॅन्ड हॉस्पिटलमधील सेमिनार रुममध्ये आराम करत होती. तेव्हा आरोपी रुममध्ये घुसला आणि त्याने डॉक्टरवर हल्ला करत लैगिंक अत्याचार केला. पुढे त्याने महिला डॉक्टरची निघृण हत्या केली.
यावर आता न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरवण्यात आले आहे. भारतीय न्याय संहीता कलम 64 (बलात्कारासाठी शिक्षा), 66 (मृत्यूचे कारण बनल्यासाठी शिक्षा) आणि 103 (हत्येसाठी शिक्षा) नुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Discussion about this post