जळगाव । जळगाव लाचलुचपत विभागाने एक मोठी कारवाई केली. इन्स्पेक्शन मध्ये चांगल्या प्रकारे शेरा मिळावा यासाठी शिक्षकाकडून १ हजार रुपयांची लाच घेताना मुख्यध्यापकाला आज सोमवारी रंगेहात अटक करण्यात आली. एरंडोल तालुक्यातील पिपळकोठा शाळेत ही कारवाई झाली असून या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिपळकोठा येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक असून, लाच घेणारे बळीराम सुभाष सोनवणे हे शाळेतील मुख्याध्यापक आहेत. शिक्षकांमध्ये चांगले शेरा मिळवण्यासाठी इन्स्पेक्शन दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी यांनी 10,000 रुपये मागितले होते. त्या पैकी प्रत्येक शिक्षकाकडून 1000 रुपये लाचेच्या रूपात घेतले होते. तक्रारदार आणि एक शिक्षक यांच्याकडून एकूण 2000 रुपये शिल्लक होते.
तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिल्यानंतर, विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला. साक्षीदार शिक्षक आणि पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर, मुख्याध्यापकांनी लाच रक्कम घेतांना आरोपींना रंगेहात पकडले. त्यानंतर, शिक्षण विस्तार अधिकारी यांची फोनद्वारे पडताळणी केली असता, त्यांनी लाच रकमेबाबत कोणताही विरोध दर्शवला नाही आणि नंतर कॉल करतो असे सांगितले.
लाच घेणाऱ्या आरोपीविरुद्ध अधिक तपास सुरू असून, एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास केल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई होईल, असे लाचलुचपत विभागाने स्पष्ट केले आहे.
Discussion about this post