महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरु केली असून या योजनेला जुलै २०२४ पासून सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता आता जानेवारीच्या हप्त्याची लाभार्थी महिला वाट बघत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनच्या जानेवारी हप्त्याबाबात मोठी अपडेट दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार? याबाबात प्रश्न विचारले असता, अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. २६ तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे खात्यात जमा होतील, असं अजित पवार म्हणालेत.
तसेच उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेला कमी जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाले. कोणतेही यश अपयश कायम नसतं. आपल्याला यात सातत्य ठिकवायचंय, असेही अजित पवार म्हणाले.
Discussion about this post