मुंबई । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवारांसोबतच ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीतील बंडखोरीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काही दिवसापूर्वीच्या भाषणाचा दाखल देत त्यांचे आभार मानले.
शरद पवार यांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात राष्ट्रवादी पक्षातील काही नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये असताना जलसंपदा विभागात घोटाळा झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदींना केला होता.
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आज शपथ घेतली. मला आनंद आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना शपथ दिली. याचा अर्थ असा की पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आरोप हे वास्तव नव्हते. त्या सगळ्या आरोपातून पक्षाला, ज्यांच्याबद्दल आरोप केले त्यांना मुक्त केले. त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे, असा टोला शरद पवारांनी लगावला.
मला सर्वसामान्य जनतेवर, तरूण पिढीवर प्रचंड विश्वास आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांचे फोन येत आहेत. या सगळ्या स्थितीत आपण एक आहोत आमची साथ तुम्हाला आहे. अशी मतं मांडतात. ममता बॅनर्जी, यांसह अनेक पक्षाचे नेत्यांचे फोन आले, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
Discussion about this post