पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत मोठा बदल झाला आहे.पीएम किसान योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी यापैकी फक्त एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्र सरकारने या योजनेबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. मागील काळात एकाच कुटुंबातील दोन ते तीन शेतकरी या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले होते.
नवीन नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे :
कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ: यापुढे एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल.
आधार कार्ड बंधनकारक: योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.
अपात्र लाभार्थी : वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे, डॉक्टर, इंजिनिअर जे आयकर भरतात आणि पेन्शनधारक यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
मागील मूल्यांकन वर्षात आयकर भरलेली कोणतीही व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्राप्त करण्यास पात्र राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतला असेल तर ती रक्कम वसूल (Recovery) केली जाईल.
१९ वा हप्ता कधी मिळणार? :
पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हा हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे १९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. केंद्र सरकार पुढील महिन्यात, म्हणजे फेब्रुवारीमध्ये, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता जारी करू शकते. त्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून, तालुकानिहाय लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवली असल्याची माहिती आहे.
Discussion about this post