नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून नीट परीक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नीट परीक्षा आता पेपर-पेनच्या आधारे घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नीट-यूजी परीक्षा आता पेपरवर होणार आहे. केंद्रिय आरोग्य आणि शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली आहे. नीट यूजी परीक्षा ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेन पेपरच्या साहाय्याने घ्यावी, याबाबत विचार केला आहे, अशी माहिती एनटीएने दिली आहे.
राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी नीट परीक्षा घेते. त्यांनी याबाबत महत्त्वाची निर्णय घेतला आहे. एनटीएने सांगितले की, नीट यूजी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. एकाच शिफ्टमध्ये पेन आणि पेपरच्या साहाय्याने ही परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय घेतला आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात.
नीट यूजी आणि यूजीसी नेट परीक्षांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रश्न विचारले जात आहे. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी करत आहे. या तपासाकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर नीट परीक्षा द्यावी लागते. लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असते. त्यांना ही परीक्षा द्यावी लागते. नीट परीक्षा ही ७२० गुणांची असते. ही परीक्षा क्रॅक करणे खूप अवघड असते.
Discussion about this post