मुंबई : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे.
अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळही मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे. प्रफुल्ल पटेल हे सुद्धा राजभवनावर दाखल झाले आहेत. तसेच धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, हसन मुश्रीफ, अनिल वळसे-पाटीलमी, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे, नरहरी झीरवाळ यांचा समावेश आहे.
Discussion about this post