जळगाव । अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला देशात मागणी असून प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान ‘वंदे ‘भारत ट्रेन’ची सेवा लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
होय अमरावती- मुंबई आणि अमरावती-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सेवा पुरविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. त्यादृष्टीने भुसावळ विभागानेही या रेल्वेगाड्यांच्या वेळा व थांबे निश्चीत केले आहेत.
रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यानंतर जळगावकरांना अवघ्या ५ ते ७ तासांतच मुंबई, पुण्याचा प्रवास पूर्ण करता येणार आहे. मुंबई आणि पुण्यासाठी ही रेल्वेगाडी भुसावळ आणि जळगावात थांबा घेणार आहे.
असे आहेत प्रस्तावित वेळापत्रक?
अमरावती ते मुंबई
थांबे : अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक
अमरावतीहून गाडी सुटण्याची वेळ : पहाटे ०३:४०
मुंबईला गाडी पोहोचण्याची वेळ : सकाळी ११:१०
गाडी परतण्याची वेळ : दुपारी १५:५५
गाडी पोहोचण्याची वेळ : रात्री २३:२५
अमरावती ते पुणे
थांबे : अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड
अमरावतीहून गाडी सुटण्याची वेळ : पहाटे ४:२०
पुण्याला गाडी पोहोचण्याची वेळ : दुपारी १२:२५
गाडी परतण्याची वेळ : दुपारी १५.४०
गाडी पोहोचण्याची वेळ : रात्री २३:४५















Discussion about this post