नवी दिल्ली । केंद्रात मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. यावर सरकार दरवर्षी किती खर्च करते? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच उत्तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आमचे सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी 6.5 लाख कोटी रुपये खर्च करत आहे. खाद्यतेलाच्या क्षेत्रातही देशाला स्वयंपूर्ण बनवण्याबाबत पंतप्रधान बोलले.
2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय सहकार दिना’च्या एका कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान किसान योजना, एमएसपी आणि खतांमध्ये सवलत यांसारख्या त्यांच्या सरकारच्या कामांनाही त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत शेतकऱ्यांच्या शेतमालाची किमान आधारभूत किंमतीवर खरेदी करून 15 लाख कोटींहून अधिक रुपये दिले आहेत. ते म्हणाले की, सरकारने गेल्या वर्षी खत सवलतीवर 10 लाख कोटी रुपये खर्च केले. पंतप्रधान म्हणाले की, सरकार दरवर्षी सुमारे ६.५ लाख कोटी रुपये शेती आणि शेतकऱ्यांवर खर्च करत आहे.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’निमित्त डॉक्टरांच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी ट्विट केले की, ‘राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मी संपूर्ण डॉक्टर समुदायाचे मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी अभूतपूर्व काळातही डॉक्टरांनी धैर्य, निस्वार्थीपणा आणि पराकोटीचा आदर्श ठेवला आहे. उपचारापलीकडचे त्यांचे समर्पण आपल्या समाजाला आशा आणि बळ देते.
प्रसिद्ध डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ १ जुलै रोजी ‘राष्ट्रीय डॉक्टर्स डे’ साजरा केला जातो. रॉय हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीही होते. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी या दिवशी येते. आणखी एका ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनीही ‘चार्टर्ड अकाउंटंट्स डे’ निमित्त या व्यावसायिकांच्या सेवेचे कौतुक केले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) ची स्थापना 1 जुलै 1949 रोजी झाली. पंतप्रधानांनी ट्विट केले की, ‘चार्टर्ड अकाउंटंट्स डे निमित्त आम्ही एका व्यावसायिक समुदायाचा सन्मान करतो जो आपल्या देशाच्या प्रमुख आर्थिक शिल्पकारांपैकी एक आहे. त्यांची विश्लेषणात्मक कौशल्ये आणि दृढ वचनबद्धता आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते. त्यांचे कौशल्य समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यात मदत करते.
Discussion about this post