मुंबई । राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महावितरणने आपल्या वीज ग्राहकांसाठी एक खास योजना उलब्ध करुन दिली आहे. या योजनेच्या अंतर्गत वीज ग्राहकांना आपल्या वीज बिलात 120 रुपयांची सूट मिळणार आहे. नव वर्षाची भेट म्हणून ‘गो ग्रीन’ योजना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महावितरणने आपल्या वीज ग्राहकांसाठी गो ग्रीन योजना उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांना आपल्या वीज बिलात एकरकमी 120 रुपयांची सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. गो ग्रीन योजना ही कागद वाचवा आणि पर्यावरण वाचवा या संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजेच गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना छापील कागदी वीज बिल मिळणार नाहीये तर त्याऐवजी ई मेलच्या माध्यमातून वीज बिल पाठवण्यात येणार आहे.
गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा ईमेलच्या माध्यमातून वीज बिल पाठवण्यात येते. तसेच या बिलात 10 रुपयांची सूट ग्राहकांना देण्यात येते. पण आता नव्या वर्षापासून वीज ग्राहकांनी गो ग्रीन ही सेवा निवडल्यास दरमहा 10 रुपयांची सूट देण्याच्या ऐवजी एकरकमी 120 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
महावितरणच्या ग्राहकांना गो ग्रीन या सेवेचा पर्याय निवडायचा असल्यास किंवा गो ग्रीन साठी नोंदणी करायची असल्यास https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp किंवा https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen.php या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तसेच https://wss.mahadiscom.in/wss या ठिकाणी भेट देऊ शकतात. यासोबतच तुम्ही महावितरणच्या मोबाईल अॅपवरुन सुद्धा नोंदणी करु शकता.
Discussion about this post