१ जानेवारीला केवळ वर्षच बदलले नाहीय तर अनेक प्रमुख नियमही बदलले आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. या नियमांमध्ये LPG गॅस सिलिंडर, EPFO ते UPI संबंधित अशा अनेक नियमांचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात आजपासून काय नियम बदलले आहेत.
LPG च्या किंमती (LPG Price)
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन वर्षात एलपीजी गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत. व्यावसायिक गॅसच्या किंमती कमी झाल्या आहेत.
EPFO चा नियम (EPFO Rule Change)
नवीन वर्षात पेन्शनधारकांसाठी नियम बदलण्यात आले आहेत. आता पेन्शनधारक कोणत्याही बँक खात्यातून पैसे काढू शकणार आहेत. याआधी फक्त रजिस्टर बँक खात्यातून पैसे काढता येत होते.
UPI लिमिट (UPI Limit)
नवीन वर्षात UPI 123 वर व्यव्हार करण्याची लिमिट वाढवण्यात आली आहे. आता तुम्ही एका वेळी कमाल १०,००० रुपये पाठवू शकतात. याआधी ही लिमिट ५,००० रुपये होती.
रुपे कार्डधारकांना लाउंजचा लाभ
रुपे कार्जधारकांना आता विमानतळावरील लाउंजचा मोफत वापर करता येणार आहे. यामुळे सतत परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे.
एनबीएफसींच्या मुदतठेवींच्या नियमांमध्ये बदल
१ जानेवारीपासून एनबीएफसींच्या मुदत ठेवींसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. यात मॅच्युरिटीपूर्वी मुदतठेवी मोडणाऱ्या, तसेच ठेवींसाठी दिले जाणाऱ्या नामांकनाबाबत नियमांचा समावेश आहे.
आयकर नियम (Income Tax Rule)
२०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आयकरबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.या नवीन नियमांमुळे कर सवलत आणि कर कपातीत बदल होणार आहेत. नागरिकांना कर कपातीचा फायदा होऊ शकतो.
या फोनवर व्हॉट्सअॅप होणार बंद
१ जानेवारीपासून काही अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. जवळपास २० फोनवर व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. अँड्रॉइड ५.० आणि नवीन अँड्रॉइड स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सेवा सुरु राहणार आहे.
Discussion about this post