जळगाव : जळगाव शहरातील एका महिला व्यापाऱ्याची 2 लाख 34 हजार रूपयांत फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा येथील संत मिराबाई नगरात कांचन सुरेश येवले (वय ३८) या महिला त्यांचा पशूखाद्य खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित आरोपी गोरख कैलास दुधरे (रा. गल्ले बोरगाव ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजी नगर) याने महिला व्यापारी कांचन येवले यांच्याशी संपर्क केला. विश्वास संपादन करून सांगितले की, मला व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडून 170 पशूखाद्याच्या गोण्या तुमच्या कडील ट्रकमध्ये पाठवून देण्याचे सांगितले. त्यानुसार महिलेने विश्वास ठेवून दिलेल्या ऑर्डरप्रमाणे 2 लाख 34 हजार रूपये किंमतीच्या 170 पशुखाद्याच्या गोण्यांनी भरलेला ट्रक स्वत: जावून त्यांनी पोहचवून दिला.
दरम्यान, दिलेल्या ऑर्डरप्रमाणे पैसे न देता महिला व्यापारी यांची फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सोमवार (दि.30) रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी गोरख कैलास दुधारे (रा. गल्ले बोरगाव ता.खुलताबाद जि.छत्रपती संभाजी नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विजय पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
Discussion about this post