जळगाव । एकीकडे नवीन वर्षाच्या आगमनाची जल्लोषात तयारी सुरु असताना जळगाव जिल्ह्यातील पाळधी किरकोळ कारणावरून दोन गटात मोठा वाद उफाळून आला आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. सोबतच वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याने तणावाचे वातावरण पाळधीत झाले होते.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.
दरम्यान, पोलिसांनी दंगलीच्या संदर्भात तात्काळ कृती करत काही जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. तर याबाबत रात्री उशीरापर्यंत पाळधी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पाळधी गावात सध्या वातावरण हे पूर्णपणे नियंत्रणात आले. कुणीही समाजमाध्यमांवर या संदर्भात अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post