जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम, प्रशाळाआदींविषयीची माहिती आकाशवाणी जळगाव केंद्रावर’उत्तुंग भरारी’या कार्यक्रमांतर्गत ५२ भागांमधून दिली जाणार असूनसोमवार दिनांक 3 जुलै रोजी कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी यांच्या मुलाखतीने या कार्यक्रमाचा प्रारंभ होत आहे.
आकाशवाणी जळगाव केंद्रावर प्रत्येक सोमवार आणि शुक्रवारी सकाळी ७.४५ ते ८ या वेळेत उत्तुंग भरारी हा कार्यक्रम सादर होणार आहे. कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांची मुलाखत दि.३ व ४ जुलै आणि दि. ७ व ८ जुलै रोजीअशा चार भागांमध्ये प्रसारित केली जाणार आहे.यामध्ये विद्यापीठाची ओळख आणि नवीन शैक्षणिक धोरण यावर प्रा. माहेश्वरी विस्ताराने बोलणार आहेत.
त्यानंतर प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी उत्तुंग भरारी हा कार्यक्रम प्रसारित होईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठात पदवी स्तरावर सुरूझालेले नवीन अभ्यासक्रम तसेच सर्व प्रशाळांची ओळख,त्यामधील अभ्यासक्रम,रोजगाराच्या संधी, पायाभूत सोयी सुविधायावर संचालकांच्या मुलाखतींमधून प्रकाश टाकला जाणार आहे.
याशिवाय विद्यापीठातील वसतिगृह, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास योजना, विस्तार सेवा विभागामार्फत राबवले जाणारे उपक्रम,उद्योजकता विकासाची संधी, प्लेसमेंट,क्रीडा सुविधा, आदींविषयी ची माहितीआकाशवाणी जळगाव केंद्रावरून दिली जाणार आहे.खानदेशातील विद्यार्थी आणि पालकांसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती नवोपक्रम ,नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर यांनी दिली.
Discussion about this post