जळगाव । महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये येत्या ७ जानेवारीपासून थंडीचा कडाका अनुभवायला मिळणार आहे, असे हवामान विभागाच्या अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. या थंडीच्या लहरीमुळे जळगावसह ११ जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
हिमालयात पुन्हा पश्चिमी चक्रवात येत असल्याने तेथे हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात जळगावसह ११ जिल्ह्यांत ३ ते ७ जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
गेल्या आठवड्यात जळगावसह राज्यात ढगाळ हवामान आणि पावसामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, आता पुन्हा वातावरण कोरडे झाले असून यातच उत्तरेकडून येणारी थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे.
थंडी वाढणारे ११ जिल्हे
नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, अमरावती अकोला, नागपूरात ते ७ जानेवारीदरम्यान थंडीचा कडाका अधिक राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Discussion about this post