जळगाव । तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथील संजय हरी पाटील (वय ३२) हा शिर्डीला जात असल्याचे सांगून हा घराबाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर त्याने थेट स्मशानभूमी गाठली आणि येथील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला शर्टाच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरसोली प्र.बो येथील संजय हरी पाटील ट्रकचालक म्हणून काम करत होता. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी संजय पाटील हा शिर्डीला जात असल्याचं सांगून घराबाहेर पडला. त्यानंतर त्यांनी गावातील स्मशानभूमी गाठली. या स्मशानभूमीत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला शर्टाच्या साहाय्याने गळफास घेवून संजय पाटीलने आत्महत्या केली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय पाटील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी सुन्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post