मुंबई । सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरू असून आता या आठवड्याचा शेवटच्या दिवशी सोनं महाग झालेलेल दिसत आहे. त्यामुळे आता ऐन लग्नसराईत सामान्यांना सोन्याचे दागिने खरेदीसाठी खिश्याला परवडणार नसल्याचे दिसत आहे.
भविष्यातही सोन्याची किंमत विक्रमी स्तरावर उसळी घेण्याची शक्यता आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून तुम्हीही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल सोन्या- चांदीचा भाव जाणून घ्या.
सोन्याचा भाव हा वायदे बाजारात वाढला असून ग्राहकांच्या खिश्याला या आठवडा संपता महागाईचा फटका बसलेला दिसत आहे. वायदे बाजारात MCX वर सोन्याचा फेब्रुवारी वायदा घसरणीसह ७६,२३१ प्रति ग्रॅमवर उघडला. वायदे बाजारात सोन्याचा भाव काल हा ७६,०४३ रुपयांवर बंद झाला. आता वायदे बाजारात सोन्याचा भाव हा १२३ रुपयांनी वाढून ७६,१६८ रुपये आहे.
देशांतर्गत सराफा बाजारातील सोन्याची किंमत
या काळात, देशांतर्गत सराफा बाजारातही आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भाव वाढलेले पाहायला मिळत आहे. गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६५० रुपयांनी वाढ झाली असून किंमत ही ७७,४५० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव हा ७१,००० रुपये तर त्याचवेळी, भारतीय ग्राहकांना आज चांदी ९१,५०० रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध आहे.
Discussion about this post