मुंबई । सध्या देशभरात लग्नाचे सिझन सुरु असून या काळात सोन्याची मागणी वाढतेय. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. याचं कारण म्हणजे आज देखील सोन्याचा भाव उतरला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज २० डिसेंबर रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,69,500 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,055 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 56,440 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,550 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,69,500 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 76,950 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,560 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,695 रुपयांनी विकलं जात आहे.
Discussion about this post