मालेगाव येथे भल्या पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांच्या पुत्र अविष्कार भुसे यांच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
नेमकी घटना काय?
मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कार हा त्याच्या दोन मित्रांसमवेत मालेगाव- सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेवून मालेगावकडे परत येत होते. यावेळी टेहेरे चौफुलीजवळ मागून संशयित गो तस्कर दोन वेगवेगळ्या गाडीमधून येत त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तसेच त्यांच्या गाडीला डीव्हायडरकडे दाबण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोणेटवर आरडा ओरडा करत रॉड मारला.
या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डीव्हायडरमध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला. तर संशयित गो तस्कर यांच्या देखील गाड्या डीव्हायडरला ठोकल्या गेल्या. या अपघातामुळे त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून येवून त्यांनी त्या संशयितांना पकडले. त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
गाडीत आढळले दोर, लाठ्या काठ्या
दरम्यान नागरिकांनी पोलिसांना फोन करून घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत वाहनांची तपासणी केली. यात एका गाडीमधून गो तस्कर करण्याचे दोर, लाठ्या काठ्या असे साहित्य आढलून आले. हे गो तस्कर असतील असा स्थानिकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान अपघातातील जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Discussion about this post