हिवाळ्यातील थंडगार हवामान आणि कमी सूर्यप्रकाश यामुळे शरीराला अनेक प्रकारचा सामना करावा लागतो. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि शरीरात ऊर्जा राखून ठेवणे अत्यंत महत्वाचे असते. यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे हा एक उत्तम मार्ग आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
हिरव्या पालेभाज्यांचे पोषणमूल्य
हिरव्या पालेभाज्या पोषणमूल्यांचा खजिना आहेत. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, सरसो (मोहरीची पाने), आणि माठ या भाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, सी, आणि के यांसारखे जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स, आणि पाण्याचे प्रमाणही या भाज्यांमध्ये जास्त असते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला यांसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराला रोगांपासून बचाव करण्यास मदत करतात. पालकात विशेषत: व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी-खोकल्यापासून बचाव करतात.
हिरवी गार पालक
पालकची भाजी सगळ्यांना नकोशी असते. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात लोह, व्हिटॅमिन्स आणि फोलेट असतात. त्याने तुम्हाला सहसा कोणत्याच रोगाची लागण होणार नाही. तसेच या भाजीत ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहतात. तसेच थंडीमध्ये शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी पालक खूप महत्वाची असते.
केल पालेभाजी खाण्याचे फायदे
केल ही पालकासारखीच दिसणारी पालेभाजी आहे. ही आरोग्यासाठी अत्यंत पौष्टीक पालेभाजी आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, आणि के भरपुर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये भरपुर कॅल्शियम असतात. त्याचा फायदा आपली हाडे मजबूत करण्यासाठी होतो.
मोहरीच्या पानांची भाजी
मोहरीच्या पानांची भाजी भारतीय लोक खूप जास्त प्रमाणात करतात. यात सी, के आणि बीटा-कॅरोटीन ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात. जी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून कार्य करतात.
राजगिराच्या पानांची भाजी
लाल पालक म्हणजेच राजगिराची पाने. ही भाजी हिवाळ्यात तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध होईल. त्यामध्ये लोह, कॅलशियम आणि पोटॅशियमच प्रमाण जास्त असते. त्याने हाडे मजबूत होतात आणि पचनक्रिया सुधारते.
Discussion about this post