सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादितमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
सिडकोमध्ये चांगल्या पगाराची नोकरी तुम्हाला मिळणार आहे. सिडकोमधील या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.सिडकोमध्ये सहाय्यक विकास अधिकारी, क्षेत्राधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सिडकोच्या या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष असावी. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. सहाय्यक विकास अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच संबंधित क्षेत्रात स्पेशलायझेशन केलेले असावे. क्षेत्राधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४१,८०० ते १,३२,३०० रुपये पगार मिळणार आहे.
२९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परिक्षेद्वारे करण्यात येणार आहे. या परिक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तुमची निवड करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२५ आहे.
Discussion about this post