‘पुष्पा 2’ हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असताना याच दरम्यान, सुपरस्टार अल्लू अर्जुनवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली आहे.
4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे.
याबाबत असे की, 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला संध्या सिनेमागृहात विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. लोक आगाऊ तिकीट काढून चित्रपट बघायला आले होते आणि अल्लू अर्जुनही तिथे येणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. पण अल्लू अर्जुनच्या टीमने अचानक त्याची भेट ठरवली आणि तो थिएटरमध्ये पोहोचताच त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे अल्लू अर्जुन आणि इतरांवर गुन्हेगारी निष्काळजीपणाचे आरोप झाले.
उच्च न्यायालयात अपील दाखल
अल्लू अर्जुनने या घटनेबाबत तेलंगणा उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, ज्यामध्ये त्याने या घटनेत आपली कोणतीही चूक नसल्याचे म्हटले होते. त्यावेळी तो दुर्दैवाने तिथे उपस्थित होता. याआधीही एका प्रकरणात शिल्पा रवी रेड्डी यांच्या घरी घडलेल्या एका घटनेत ते हजर होते, मात्र त्या प्रकरणात हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला होता. आता या नव्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
Discussion about this post