जळगाव । एकीकडे लग्नसराईचा धुमधडाका सुरु असून याच दरम्यान दुसरीकडे सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदी भावात मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदीदारांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याशिवाय सध्या लग्न सराईचा सिझन सुरू असून त्यामुळे या कार्यक्रमासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातेय.
जळगावच्या सराफ बाजारात गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,३०० रुपये इतका होता. आज शुक्रवार सकाळच्या सत्रात तो वाढून ७८७०० रुपये (विनाजीएसटी) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर १००० रुपयांनी वाढून विनाजीएसटी ९६००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
गेल्या चार दिवसात सोन्याच्या भावात २१०० रुपये प्रति तोळा वाढ झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे चांदी ३ हजार रुपयांनी महागली आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने ७६,६०० रुपयावर तर चांदी ९३००० रुपये प्रति किलोवर होती.
Discussion about this post