जामनेर । जामनेरहून पहुरकडे जाणाऱ्या दुचाकीला समोरुन भरधाव येणाऱ्या टेम्पोने पहुरगावाजवळ धडक दिली आणि टेम्पो दुचाकीवरच उलटल्याने दुचाकीस्वार शालक व मेहुणे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, शेंदुर्णी येथील मयूर गणेश चौधरी (वय २५), त्यांचे मेहुणे शंकर भगवान चौधरी (रा. माणिक नगर, धुळे (वय ३५)) व मित्र मयूर देवेंद्र गोढरी (रा. शेंदुर्णी) हे तिघे बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मोटरसायकलने (क्रमांक एमएच १९ बीआर-२१२६) जामनेरहून पहूरकडे जात असतांना राजश्री कोटेक्सजवळ समोरून येणाऱ्या ४०७ टेम्पोने (क्र. एमएच २० डीई-४३१३) जोरदार धडक दिली, यात तिघे खाली पडले. त्यानंतर टेम्पो त्यांच्या अंगावरच उलटली आणि मयूर चौधरी व शंकर चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मयूर गोढरी हा गंभीर जखमी झाला.
नागरिक व पोलिसांनी हा टेम्पो बाजूला करून दोघांचे मृतदेह बाजूला काढून मयूर गोढरी याला ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना केले.















Discussion about this post