सरकारी नोकरीच्या विविध संधी सध्या उपलब्ध असल्याचे दिसत आहे. अशीच संधी सध्या 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. भारतीय पशुपालन निगम लिमिटेड या सरकारी विभागाने मोठी भरती जाहीर झाली असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जुलै 2023 आहे.
या पदभरती अंतर्गत 3444 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. यामध्ये सर्वेक्षक पदाच्या 2870 जागा तर सर्वेक्षक प्रभारी पदाच्या 574 जागा आहेत.
पात्रता :
सर्वेक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात 12वी उत्तीर्ण
सर्वेक्षक प्रभारी शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही विषयात 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.
परीक्षा फी :
सर्वेक्षक- रु.826 आहे.
सर्वेक्षक प्रभारी -944
पगार : प्रभारी सर्वेक्षक पदासाठी दरमहा 24 हजार रुपये तर सर्वेक्षक पदासाठी दरमहा 20 हजार रुपये वेतन आहे.
निवड प्रक्रिया ?
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.
Nofitication : Download
ऑनलाईन अर्ज : क्लीक करा
Discussion about this post