जळगाव । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ७ डिसेंबर रोजी आविष्कार संशोधन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात ३०० विद्यार्थी सहभागी होणार आहे. स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यात पहिल्या गटात मानव्यविद्या, भाषा व ललित कला, दुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषी आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समवेश आहे. ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तर पदवी या तीन संवर्गात होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता उद्घाटन होणार
विद्यापीठाच्या पदवी प्रदान सभागृहात सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून ओरिएंट सिमेंट लि. चे उपाध्यक्ष अतुलकुमार अग्रवाल, सहायक महाव्यवस्थापक रोहित जोशी हे असतील. या वेळी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य. प. सदस्य राजेंद्र नन्नवरे व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती समन्वयक प्रा. रमेश सरदार व उपसमन्वयक डॉ. विशाल पराते यांनी दिली.
Discussion about this post