मुंबई । देशात लग्नसंमारंभाच्या सिझनमध्ये आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढल्याचं दिसून येतंय. या काळात सोन्याची मागणी वाढत असल्याने सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून येतंय. काल सोन्याच्या भावात परवाच्या तुलनेत कोणतेही बदल झाले नव्हते, मात्र आज सोन्याचे भाव वाढल्याचं दिसून आलं आहे.
जाणून घ्या सोन्याच्या दरात नेमकी किती रुपयांनी वाढ झाली आहे आणि या दरवाढीनंतर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी (5 डिसेंबर 2024) सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,77,800 रुपयांवरुन 7,78,900 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हा दर 77,780 रुपयांवरुन 77,890 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
शहराचे नाव | आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) | कालचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) |
मुंबई | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
पुणे | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
नागपूर | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
कोल्हापूर | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
जळगाव | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
सांगली | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
बारामती | 77,890 रुपये | 77,780 रुपये |
Discussion about this post