मुंबई । जून महिना संपायला अवघे दोन दिवस उरले असून यानंतर जुलै महिन्याला सुरुवात होईल. या नवीन महिना सुरु होण्यासोबतच अनेक बदल देखील होतात. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) जुलै 2023 मध्ये बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली आहे. त्यानुसार जुलै महिन्यामध्ये 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे अर्धा महिना बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
जर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची तारीख माहिती असेल तर तुम्हाला बँकेशीसंबंधीत काम मार्गी लावण्यासाठी नियोजन करता येते. जर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची यादी माहिती नसेल तर तुमची ही कामं रखडतात आणि तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे जुलै महिन्यात बँका कोणत्या दिवशी बंद राहणार हे जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
बँकेच्या सुट्टीच्या दिवशी कोणतेही तातडीचे काम असल्यास तुम्ही एटीएम, इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग आणि इतर सेवांचा वापर करु शकता. तसंच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI वापरू शकता. यासोबतच तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्डचा देखील सहज वापर करु शकता.
जुलै 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी –
5 जुलै (बुधवार) – गुरु हरगोविंद जयंती – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद
6 जुलै (गुरुवार) – MHIP दिवस – मिझोरममध्ये बँका बंद
11 जुलै (मंगळवार) – केर पूजा – त्रिपुरामध्ये बँका बंद
13 जुलै (गुरुवार) – भानू जयंती – सिक्कीममध्ये बँका बंद
17 जुलै (सोमवार) – यू तिरोट सिंग डे – मेघालयमध्ये बँका बंद
21 जुलै (शुक्रवार) – द्रुक्पा त्शे-जी – सिक्कीममध्ये बँका बंद
२८ जुलै (शुक्रवार) – आशुरा – जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद
29 जुलै (शनिवार) – मोहरम (ताजिया) – त्रिपुरा, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, यूपी, बंगाल, नवी दिल्ली, बिहार, झारखंड, एचपीमध्ये बँका बंद
Discussion about this post