मुंबई । राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता १२ दिवस उलटून गेले होते. मात्र अजूनही मुख्यमंत्री कोण असणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नव्हतं. मात्र, आता स्पष्ट झालं आहे. महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत जाऊन आल्यानंतर मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर आज देवेंद्र यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदाची बैठक आज पार पडली. या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदी फडणवीसांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीसच तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून उद्या म्हणजेच गुरुवारी, 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणाऱ्या शपथविधी सोहळ्यात तेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसणार आहेत.
दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळी नावं समोर आली होती. धक्कातंत्र वापरलं जाणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भाजपकडून फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री कोण होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Discussion about this post