जळगांव। गोजराई फाउंडेशन जळगाव आणि नाट्यरंग थिएटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालनाट्य महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात उदंड प्रतिसादात पार पडला. या महोत्सवात तरुण लेखक,दिग्दर्शक अमोल ठाकूर लिखित व दिग्दर्शित “कोर्ट ऑफ कार्लेकर” आणि “वाघोबा” ही दोन बालनाट्य सादर झालीत.
या दोन ही बालनाट्याचे नेपथ्य सचिन कापडे रंगभूषा व वेशभूषा दिशा ठाकूर प्रकाशयोजना स्वप्नील गायकवाड यांनी केले. तर यात जळगाव मधील स्थानिक बालकलाकार शर्वा जोशी,अथर्व रंधे,वैष्णवी पाटील,श्लोक गवळी,दृष्टी ठाकूर,मयंक ठाकूर,निर्गुणी बारी,कृष्णा पाटील,अथर्व पाटील,प्रणव जाधव, प्रणित जाधव,रागिणी सोनवणे,आदर्श सोनवणे,अंशा चव्हाण,कृष्णा चव्हाण,कृत्तिका कोरे, केतकी कोरे, वृषभ मूनोत, पीयूष भूक्तार, मोहित सोनवणे यांनी त्यांच्या अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
महोत्सवाला जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्याचबरोबर महापौर जयश्री महाजन,मनपा नगरसचिव सुनील गोराणे, शिक्षण विस्तार अधिकारी तथा उप शिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण, माय FM94.3 रेडिओचे आरजे देवा, डॉ.मनोहर जाधव मुर्तीजापूर तहसीलचे मंडळ अधिकारी राजेंद्र जाधव, मननराज बिल्डर्स अँड डेव्हलपरचे रावसाहेब पाटील तसेच रेडक्रॉसचे माजी चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी आदी. मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. महोत्सवाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.
या महोत्सवात नाटकातील कलाकारांसोबत च महाराष्ट्राच्या रंगभूमी वर आपल्या कलेची छाप सोडणाऱ्या जळगावातील डी आय डी लिटिल मास्टर सिझनफोरचा सागर वापरे, मी होणार सुपरस्टारचा मास्टर दिवेश, त्यांचे नृत्य दिग्दर्शक भगवान पाटील आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रा. हेमंत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय नाट्यरंग थिएटरचा पहिला पुरस्कार जळगावातील ज्येष्ठ कलावंत, लेखक, दिग्दर्शक, डॉ हेमंत कुलकर्णी यांना देण्यात आला.
महोत्सवाला जळगावातील विद्यार्थी आणि पालक, रसिक प्रेक्षकांनी तुडुंब उपस्थिती देवून महोत्सव यशस्वी केला..या महोत्सवाला नाट्यरंगचे अमोल ठाकूर, गोजराई फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गायकवाड व स्वप्नील गायकवाड यांच्या सोबतच सचिन महाजन, ज्ञानेश्वर वाघ, पंकज बारी, दीपक महाजन,गौरव लवंगले,आकाश बाविस्कर, दर्शन गुजराथी, हर्ष गायकवाड, मोहित पाटील,धनश्री जोशी, जवाहर वानखेडे,महेश चौधरी,यश साळुंखे, नेहा पवार ,पंकज वारुळे निशिता चौधरी,भावेश बडगुजर,धनश्री भावसार,अक्षय चव्हाण,राहुल ननवरे,गणेश गंगावणे,ललित घुगे आदी. चे मोलाचे सहकार्य लाभले.
Discussion about this post