तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन ओव्हरसीज बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ओव्हरसी बँकेत JMG स्केल I मध्ये अधिकारी आणि क्लर्क कॅडर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी तुम्ही १३ डिसेंबरपर्यंत अर्ज करु शकतात
इंडियन ओव्हरसीज बँकेतील ही भरती १६ रिक्त पदांसाठी होणार आहे. बास्केटबॉलसाठी ४ पदे रिक्त आहेत. हॉकीसाठी ४ पदे, वॉलिबॉलसाठी ४ पदे, क्रिकेटसाठी ४ पदे रिक्त आहेत.
या नोकरीसाठी १८ ते २६ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
इंडियन ओव्हरसीज बँकेत अधिकारी (JMG स्केल I)पदासाठी ४८,४८० ते ८५,९२० रुपये पगार मिळणार आहे. क्लर्क कॅडर पदासाठी २४,०५० ते ६४,४८० पगार मिळणार आहे.अनुभवानुसार उमेदवारांचा पगार वाढणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
Discussion about this post