मुंबई | मागील काही दिवसापासून सोने आणि चांदी भावात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. सोने-चांदीच्या चढउताराचा ग्राहकांच्या खिशांवर चांगलाच परिणाम होतोय. दरम्यान या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.
गेल्या आठवड्यात सोन्यामध्ये 1 हजारांची दरवाढ नोंदवली गेली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याच्या किमतीमध्ये 650 रुपयांची घसरण झाली. त्यात 22 आणि 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव खाली उतरल्याचे दिसून आले. तर काल 2 डिसेंबर रोजी पुन्हा 650 रुपयांनी सोने वधारले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळाले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77, 500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या पंधरा दिवसांत चांदीने देखील मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या आठवड्यात चांदीमध्ये 2500 रुपयांची घसरण दिसून आली. तर या आठवड्याच्या अखेरीस त्यात 2 हजारांची दरवाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार एक किलो चांदीचा भाव हा 91 हजार रुपये इतका आहे.
Discussion about this post