इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. हर्षवर्धन कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे रहिवासी होते. पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण पूर्ण करुन हर्षवर्धन कर्नाटकमधील होलेनरसीपूर येथे परिवीक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी जात होते. त्यावेळी हासनपासून 10 किलोमीटर लांब असणाऱ्या किट्टाने या गावाजवळ रविवारी संध्याकाळी अपघात झाला. त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या गाडीचा चालक मंजेगौडा याला किरकोळ दुखापत झाली आहे.
प्रशिक्षण पूर्ण करुन जात होते…
आयपीएस हर्षवर्धन यांनी नुकतेच म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीत चार आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. ते मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील दोसर गावाचे रहिवाशी आहे. त्यांचा परिवार बिहारमधील आहे. परंतु आई-वडील मध्य प्रदेशात राहत होते. त्यांचे वडील अखिलेश हे सबडिव्हीजनल मजिस्ट्रेट आहे.
Discussion about this post