मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवसात उलटले तरी देखील नवी सरकार स्थापन झाले नाहीय. या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र नवे सरकार गठित होण्यास सतत विलंब होतोय. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी दरेगावात गेल्याने शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक स्थगित करण्यात आली. मात्र आज शनिवार संध्याकाळपर्यंत शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात असं वक्तव्य शिवसेना संजय शिरसाट यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचारविनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात, उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं शिरसाट म्हणाले.शिवसेनेच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी स्थगित झालेली बैठक आका रविवारी मुंबईत आयोजित करण्यात येऊ शकते. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी ते केंद्रीय निरीक्षकांच्या येण्याची वाट पाहत आहेत.
नव्या सरकारमधील शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेनेत मतभेद निर्माण होत आहेत. काही नेते शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला देत आहेत. पण अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आता ही भूमिका त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे काहींचे मत आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर हे पद त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या तरी नेत्याकडे जाईल, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.
Discussion about this post