जळगाव । राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यानुसार जळगाव विद्यापीठाचे कामकाज आज म्हणजेच २८ जून रोजी सुरू राहणार आहे. तर उद्या २९ जून रोजी कामकाज बंद राहील.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २६ जून रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकान्वये बकरी ईद हा सण २८ जून ऐवजी २९ रोजी येत असल्याने २८ जून रोजी जाहीर केलेली सुटी रद्द करून २९ जून रोजी केली आहे. या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पत्रक काढले
Discussion about this post