पुणे । दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर केले असून मंडळाने दोन विषयांच्या पेपरमध्ये अंतर ठेवले आहे. दोन ते तीन दिवसांचे अंतर ठेवल्याने विद्यार्थ्यांना पुढच्या पेपरचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार आहे.
दोन विषयांच्या पेपरमध्ये काही अंतर ठेवल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही ताण येणार आहे. जर लागोपाठ सलग पेपर असते तर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. विद्यार्थ्यांवर ताण येऊ नये, हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळावा. जर वेळ मिळाला नाही तर विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते, त्यामुळे बोर्डाने पहिल्यांदा दहावी-बारावीच्या परीक्षा १० दिवस आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे बारावीचे पेपर सलग होणार आहेत. परंतु त्यानंतरच्या विषयांच्या पेपरमध्ये दोन ते तीन दिवसांचे अंतर असेल. दहावीचा पहिला पेपर २१ फेब्रुवारीला आहे.तर दुसरा पेपर थेट १ मार्च रोजी आहे. या दोन्ही पेपरमध्ये ९ दिवसांचे अंतर आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा ही पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यानंतर जवळपास २ आठवड्यांनी लेखी परिक्षेला सुरुवात होणार आहे. याबाबत वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आले आहे. तुम्ही https://mahahsscboard.in/mr या वेबसाइटवर जाऊन वेळापत्रक पाहू शकतात.
Discussion about this post