मुंबई । गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत, ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवत त्यांच्याकडून पाठींब्याबाबतची प्रतिज्ञापत्र लिहून खबरदारी घेतली जात आहे. आता एकनाथ शिंदे यांनीही जबाबदारीचे पाऊल उचलले आहे.
शिवसनेतील बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत.
पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताज लॅड्स येथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गट नेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेंची निवड करत, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवले.
मात्र तरीही शिंदेकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये याबाबत ही खबरदारी घेतली जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Discussion about this post