मुंबई । राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर आली असून यात महायुतीने २२३ जागांवर आघाडी घेतली. तर महाविकास आघाडीला केवळ ४७ जागांवर मजल मारता आलीय. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान या अभूतपूर्वी विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
शिंदे म्हणाले की, सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या निवडणुकीत महायुतीला अगदी थंम्पिंग मेजोरिटी अशा प्रकारचा विजय मिळालेला आहे. त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि माझ्या लाडक्या बहिणींचंही अभिनंदन करतो. लाडक्या बहिणींनी मतदान केलं. लाडक्या भावांनी, शेतकऱ्यांनी मतदान केलं. ज्येष्ठ आणि समाजातील प्रत्येक घटकाने महायुतीला भरभरून मतदान दिलं.
गेली अडीच वर्षे सरकारने जी कामे केली, त्या कामाची पोचपावती या निवडणुकीत जनतेने दिली. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. पूर्णपणे जे काम केलं अडीच वर्षांत त्याची नोंद आणि कामाची पोचपावती आम्हाला दिली. पुढच्या कार्यकाळात आणखी जबाबदारी वाढली आहे. जनतेला त्रिवार वंदन करतो. माझ्या कार्यकर्यांना धन्यवाद देतो. मनापासून सर्वांनी काम केलं. म्हणूनच हा विजय मिळाला. माझ्या मतदारसंघातील मतदारांचे धन्यवाद देतो. खूप मोठ्या फरकाने मला विजयी करण्याचे प्रयत्न केले. सर्वांचे मनापासून अभिनंदन. असे ते म्हणाले.
राज्यातील सर्व जागांचे कल हाती आले असून, पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र महायुतीने बहुमत मिळवत मोठा झटका दिला आहे.















Discussion about this post