तुमचीही सरकारी बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मोठी पदभरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
कॉन्ट्रॅक्ट पोस्ट्स (मॅनेजर आणि इतर) अनेक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. ५९२ रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केली असावी.(CA/CMA/CFA/CS)/B.E/B.Tech/M.Tech/M.E/MCA पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत कामाचा अनुभव असायला हवा.
बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी फायनान्स विभाग, एमएसएमई, डिजिटल विभागात पदवी प्राप्त केलेली असावी. अर्ज करताना उमेदवाराला ६०० रुपये फी भरायची आहे. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली
Discussion about this post