जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. याच दरम्यान, एकनाथराव खडसे यांनी विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतून जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. तसेच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिकु चौधरी, मंगला पाटील,वंदना चौधरी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.
Discussion about this post