जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात न्यायालयात पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केला होता. अखेर हा खटला मागे घेण्यात आला आहे. या मुळे मंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे
विद्यामान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१६ साली केलेल्या वक्त्यव्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्यावरिल भ्रष्टाचाराच्या आरोपांसंबंधीत एक वक्तव्य केलं होतं. यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात समेट झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यायलयात सुरू असलेल्या या खटल्यात दोन्ही नेत्यांनी तडजोड करून हे प्रकरण मिटवण्यात आलं आहे.
या प्रमुख नुकसानीच्या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेवर मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी गुलाबराव पाटील यांनी न्यायालयासमोर त्यांच्या विरोधात दाखल केलेला आपलं नुकसानीचा दावा हा मागे घेण्याची विनंती केली ती मान्य केली.
न्यायालयातील या दाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचे वकील यांनी बोलताना म्हटले आहे की, दोघांमध्ये गैरसमजूत झाली होती त्यानुसार तडजोड झाल्यानंतर न्यायालया समोर दोघांची लेखी घेण्यात येऊन हा दावा मागे घेण्यात आला आहे.
Discussion about this post