विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यातील पक्षांकडून वेगवेगळी आश्वासनं देण्यात येत असून अशातच बीडमधील भाजपच्या उमेदवाराने तर नागरिकांना अजब आश्वासन दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
‘मला आमदार करा, एका वर्षात सगळे डुक्कर मारून टाकतो.’, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी केले आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
‘आपल्याकडे डुकरांची संख्या वाढली आहे यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. या आधी मी पंकजा मुंडे मंत्री असताना त्यांच्या वाढदिवसानिमित्त डुक्कर मारण्यासाठी नवाब हा शूटर आणला होता. आता सुद्धा डुक्कर मोठ्या संख्येत वाढले आहेत. त्यामुळे मला आमदार करा. एक वर्षात हे सगळे डुक्कर मारून टाकतो.’, असे अजब सुरेश धस यांनी दिले आहे. त्यांच्या या सभेची जोरदार चर्चा रंगली आहे.















Discussion about this post