सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यूनियन बँकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. लोकल बँक ऑफिसर या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. बँकेत ऑफिसर पदावर काम करण्याची ही उत्तम संधी आहे. त्याचसोबत निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगारदेखील मिळणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये १५०० रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ नोव्हेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
विविध राज्यात ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि ग्रुप डिस्कशनद्वारे केली जाणार आहे. ऑनलाइन परिक्षेत १५५ प्रश्न विचारले जाणार आहे. २०० गुणांसाठी ही टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बॅचलर डिग्री प्राप्त केलेली असावी. याचसोबत २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी ४८४८० ते ८५९२० रुपये पगार मिळणार आहे.
नोकरीसाठी अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने unionbankofindia.co.in या वेबसाइटवर क्लिक करा. त्यानंतर रिक्रूटमेंटवर जाऊन भरती सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर Click Here To Apply वर क्लिक करा.
यानंतर Click Here To new Registration वर क्लिक करा. यानंतर तुम्ही सर्व माहिती, फोटो अपलोड करा.
यानंतर फॉर्मची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.