जर तुम्हाला कोणत्याही परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ नोव्हेंबर पर्यंत होती. मात्र या भरतीला आता १० नोव्हेंबर २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केले नसेल त्यांनी लगेचच अर्ज करावा
या पदांवर होणार भरती
महिला व बालविकास विभागात २३६ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. संरक्षण अधिकारी गट बी, प्रोबेशन ऑफिसर गट क, स्टेनोग्राफर, सिनियर क्लर्क, सांख्यिकी सहाय्यक, संरक्षण अधिकारी, सिनियर केअर टेकर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
महिला व बाल विकास विभागातील या भरतीसाठी १०वी, १२वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे येथे नोकरीचे ठिकाण आहे. सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |