पुणे । अमळनेर येथे नियोजित असणाऱ्या आगामी 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड पुण्यातील बैठकीत झाली. यात रवींद्र शोभणे यांची ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीनिवड करण्यात आली आहे. अमळनेर येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान कोणाला मिळणार, याची साहित्य वर्तुळात मोठी उत्सुकता लागली होती.
रवींद्र शोभणे हे कथाकार, कादंबरी लेखक आणि समीक्षक आहेत. हे संमेलन डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संमेलनाचे आयोजन होण्याची शक्यता आहे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे चर्चेत होती. अखेर या बैठकीत कथाकार डॉ. रवींद्र शोभणे यांची बहुमताने निवड करण्यात आली. तसेच या बैठकीत संमेलनाच्या नियोजनाबद्दलही चर्चा करण्यात आली.
दरम्यान, शोभणे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये उत्तरायण’साठी महाराष्ट्र फाऊंडेशन(अमेरिका)चा पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी मारवाडी प्रतिष्ठानचा घनश्यामदास सराफ पुरस्कार, ‘उत्तरायण’साठी विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे कादंबरी पुरस्कार आदींचा समावेश आहे.
Discussion about this post