जर तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन यापद्धतीने अर्ज मागविले जात आहे. एसपीएमसीआयएलमध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशनमध्ये डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
डेप्युटी मॅनेजर(आयटी)अॅप्लिकेशन डेव्लपरसाठी १० पदे रिक्त आहेत. डेप्युटी मॅनेजर (सायबर सिक्युरिटी), डेप्युटी मॅनेजर(आयटी), सहाय्यक व्यवस्थापक (F&A),सहाय्यक व्यवस्थापक (एचआर) अशा विविध विभागांमध्ये भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ५०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.
सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस कंपनीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech/Personal Management/IR/MSW/इंजिनियरिंग/लॉ. इ. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, पेपर टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना तपासू शकता.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.